गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा संशयीत जिल्हा पेठ पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव (28 मार्च 2026) : गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या एका 29 वर्षीय तरुणाला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. अक्षय आनंदा सैंदाणे (29, रा.कल्याणहोळ, ता.धरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील शासकीय आय.टी.आय.च्या पाठीमागील महावितरण सबस्टेशन जवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी अक्षय आनंदा सैंदाणे (29, रा.कल्याणहोळ, ता.धरणगाव) विरोधात
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुषार विश्वास पाटील यांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई 28 मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !