किनगावच्या बॉक्सर गर्ल दिशा पाटीलचा मध्य प्रदेशातील बर्हाणपूरमध्ये मंत्र्यांच्या हस्ते सन्मान
जिजाऊ ब्रिगेडच्या तिसर्या अधिवेेशनात राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
Kingaon’s boxer girl Disha Patil honored by ministers in Burhanpur, Madhya Pradesh यावल (30 मार्च 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी बॉक्सर गर्ल दिशा पाटील हिने बॉक्सिंगमध्ये मिळालेले यश व सध्या तिची झालेली आंतरराष्ट्रीय स्कॉडमधील निवड बघता मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथे मराठा सेवा संघ मध्य भारत जिजाऊ ब्रिगेडच्या तिसर्या अधिवेशनात मध्यप्रदेशचे मंत्री लखन पटेल यांच्याहस्ते व खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत तिला सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी पार पडला. या समारंभात तिला राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताचे करतेय प्रतिनिधीत्व
किनगाव ता. यावल येथील रहिवाशी दिशा विजय पाटील ही बॉक्सिंग मध्ये सध्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणार्या सामन्यांच्या स्कॉटमध्ये त्याची तिची निवड झाली आहे. तत्पूर्वी तिने खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच विविध स्पर्धांमध्ये देखील तिने अनेक पथकांची कमाई केली आहे. तेव्हा मराठा समाजाच्या या मुलीने केलेल्या कामगिरीबद्दल तिला मध्य प्रदेशातील बर्हाणपूर शहरातील इंदिरा कॉलणीत असलेल्या गोविंदजीवाला ऑडोटोरियम जिजाऊ सभागृहात आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या तिसर्या महा अधिवेशनात सन्मानित करण्यात आले.

तिला मध्य प्रदेशचे पशुपालन मंत्री लखन पटेल यांच्या हस्ते तथा बर्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, बर्हाणुपरच्या आमदार अर्चना चिटणीस,मध्यप्रदेश मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री आर. एस.पाटील जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रिय अध्यक्ष शिवमती निर्मलाताई पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील तरुणींनी विविध क्षेत्रात करिअर करत असतांना खेळामध्ये देखील त्या करिअर घडवू शकतात आणि आपल्या देशाचेे, राज्याचे, जिल्ह्याचे व आपल्या गावाचे नाव लौकिक करून समाजातील मुलींसाठी त्या प्रेरणा ठरू शकतात असे या कार्यक्रमात मध्य प्रदेशाचे पशुपालन मंत्री लखन पटेल यांनी सांगत तिचे कौतुक केले. तेव्हा दिशा पाटील च्या झालेल्या या सन्मान व तिला मिळालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय पुरस्कार बद्दल तिचे यावल तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
दिशा पाटीलचा होणार नागरी सत्कार
किनगावच्या बॉक्सर गर्ल दिशा पाटील हिचा येत्या 11 एप्रिल रोजी किनगाव गावात भव्य असा नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते दिशाचा किनगावात नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात नागरी सत्कारचे आयोजन नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष मनीष पाटीलसह सहकार यांच्यावतीने करण्यात आले आहे.




