जळगावात लेवा पाटीदार महासंघातर्फे कौटूंबिक समुपदेशन

आयएस झालेल्या नंदीनी पाटीलचा पुणेरी पगडी देवून सन्मान


जळगाव (31 मार्च 2026) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे जळगावातील श्रीकृष्ण लॉन्समध्ये विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह या संबंधी कौटुंबिक समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गुजरात मधून महासंघाचे ट्रेनर, समुपदेशक मिळून एकूण 90 पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

समाजभूषण कन्येचा सहृदय सन्मान
दिवसभर चाललेल्या भरगच्च अशा या प्रशिक्षण वर्गात अनुभव संपन्न ट्रेनर , समुपदेशक यांनी सभागृहाला संबोधित केले. यात अनुभव कथन, केस स्टडी आणि चर्चासत्रांचा सुद्धा सहभाग होता. यावेळी लेवा पाटीदार समाजासाठी गौरवाची बाब असलेली व नुकतीच आयएस झालेली जळगावातील संजीव पाटील व शिल्पा पाटील यांची कन्या नंदिनी पाटीलचा आई वडिलांच्या उपस्थितीत पुणेरी पगडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजातील मुलामुलींसाठी प्रेरणात्मक मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. समाजासाठी दुसरी सन्मानाची बाब म्हणजे महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांचे चिरंजीव अमित नाफडे यांना जगभरातून फक्त 30 व्यक्तींची निवड करण्यात आलेला आणि त्यात अमित यांची निवड झालेला एक्युमिन एंजल्स अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्याचा स्वीकार दलीप नाफडे यांनी केला.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण लॉन्सच्या संचालिका जयश्री चौधरी-पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले तर सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ.मिलिंद पाटील यांनी केले. महिला संयोजिका, खानदेश विभाग पुष्पा पाटील यांनी आभार व्यक्त केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !