गोंडगाव विद्यालयात कर्मचार्‍यास सेवानिवृत्तीनिमित्त निरोप


भडगाव (31 मार्च 2026) : भडगाव तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विद्यालयातील सेवक व्ही. एम. जाधव हे आपल्या 19 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.ननावरे होते. प्रमुख अतिथी म्हणुन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ए.बी.मोरे होते.

प्रास्तविक एस.आर.पाटील यांनी केले. जाधव यांचा सपत्नीक सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आला तसेच त्यांचा सत्कार भुषण साळुंखे, जितेंद्र भोसले, ललित पाटील, बोधीराज वाडेकर तसेच कार्यक्रमापुर्वी सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र देशमुख, पी.व्ही.चव्हाण आदी मित्र परीवारामार्फतही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला व्ही.एम.जाधव यांच्या मातोश्री सुशीलाबाई जाधव (93) यांच्यासह कुटुंब व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थिनीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी मनोगत व्यक्त केले. यात लिपिक प्रसाद देशमुख, माजी मुख्याध्यापक ए.बी. मोरे, शिक्षक आर.एस.देवकर, सेवक अशोक परदेशी, एस.आर. महाजन आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व्ही. ए.पाटील यांनी केले.
व्ही. एम. जाधव यांनी मनोगतातुन सांगितले की, विद्यालयाने मला सेवा काळात प्रेम दिले असून आपण विद्यालयाचे ऋणी असून शाळेच्या मदतीसाठी पुन्हा मी सदैव तयार आहे.

मुख्याध्यापक बी.जी.ननावरे मनोगतातून म्हणाले की, सेवक व्ही.एम. जाधव सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची शाळेला नेहमी उणीव भासेल. आभार प्रशांत सोळंके यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास विद्यार्थी, मुख्याध्यापक बी.जी.ननावरे, सी. एस. सोन्नीस, आर.एस.देवकर, व्ही.ए.पाटील, एस.आर.पाटील, एस.वाय. पाटील, पी.व्ही.सोळंके, बी.डी.बोरसे, एस.एस.आमले, आर.एस.सैंदाणे, एस.आर.महाजन, एन.ए.मोरे, पी.जे.देशमुख, एस.जी.भोपे, ए.एम. परदेशी, एस.एल.मोरे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !