चेन्नईतील खेळो इंडिया बॉक्सींग स्पर्धेत भुसावळच्या खेळाडूंचे यश
भुसावळ (31 मार्च 2026) : चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया अस्मिता किक बॉक्सींग नॅशनल लिंग 2025-2026 मध्ये भुसावळातील खेळाडू राकेश सपकाळे आणि सुमेध शेजवळ यांच्या सहकार्याने खेळाडू आरूषी सावकारे आणि ममता कंवर या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले. या खेळाडूंना प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी भुसावळचा गौरव वाढवल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





