धुळ्यात खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेल्या आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी : 24 तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

कर्तव्यात हलगर्जी करणार्‍या धुळे मुख्यालयातील दोघा कर्मचार्‍यांचे निलंबन


Accused Booked Under MCOCA for Murder in Dhule Gives Police the Slip; Crime Branch Apprehends Him Within 24 Hours. धुळे (31 मार्च 2026) : मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात मोक्का कलम लागलेला आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यास वैद्यकीय तपासणीनिमित्त धुळ्यातील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये आणल्यानंतर त्याने बंदोबस्तावरील पोलिसांचे लक्ष चुकवत पळ काढला. या घटनेनंतर पोलिस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली मात्र धुळे गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात संशयीताच्या मुसक्या बांधल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या मुख्यालयातील पोलिस कर्मचारी हवालदार अमर देविदास खराटे व कॉन्स्टेबल गोविंदा रमेश मोरे यांना तत्काळ पोलिस अधीक्षकांनी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय घडले धुळ्यात ?
धुळ्यातील गणेश अर्जुन सोनवणे (39) विरोधात मोहाडी उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याला मोक्काचा कलम लागल्याने आरोपी 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला उपचारार्थ धुळ्यातील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले मात्र संधी मिळताच तो सोमवारी दुपारी पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून निसटला. धुळे शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आली.


24 तासांच्या आत आरोपी जाळ्यात
धुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधार्थ टीम रवाना केल्यानंतर दंडेवाला बाबा नगर, मोहाडी येथून आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

दोन पोलिस कर्मचारी निलंबित
खुनाच्या गुन्ह्यात ‘मकोका’सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुख्यालयातील पोलिस कर्मचारी हवालदार अमर देविदास खराटे व कॉन्स्टेबल गोविंदा रमेश मोरे यांना तत्काळ पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !