राजेश मोराळेंची दहा महिन्यात बदली : दीपनगरच्या मुख्य अभियंतापदी विराज चौधरी


Rajesh Morale Transferred Within Ten Months: Viraj Chaudhary Appointed as Chief Engineer at Deepnagar भुसावळ (1 एप्रिल 2026) : दीपनगर प्रकल्पातील मुख्य अभियंता राजेश मोराळे हे अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच रूजू झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई मुख्यालयातून विराज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मोराळे यांच्याकडे कोराडी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अभियंता पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान, पंकज सपाटे यांच्याकडून कार्यकारी संचालक एक हा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे आता केवळ कार्यकारी संचालक (इंधन) हा एकमेव पदभार आहे.

दहा महिन्यातच मोराळे यांची बदली
मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी 31 मे 2025 रोजी भुसावळ (दीपनगर केंद्र) मुख्य अभियंता म्हणून पदभार घेतला होता व यानंतर प्रशासकीय कारणास्तव कोराडी, खापरखेडा, भुसावळ आणि मुख्यालयात फेरबदल झाले. त्यात मोराळे यांची भुसावळ येथून कोराडी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये बदली करण्यात आली तर भुसावळातील त्यांच्या रिक्त जागेवर मुंबई मुख्यालयातील विराज चौधरी यांची मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली.


अन्य अधिकार्‍यांच्याही बदल्या
कोराडी केंद्रातील मुख्य अभियंता विलास मोतघरे यांची कोराडी प्रोजेक्ट तर विवेक रोकडे यांना कोराडी प्रोजेक्टवरून खापरखेडा मुख्य अभियंता पदावर बदली झाली असून सिव्हील दोनचा पदभार देण्यात आला आहे. गिरीश कुमारवार यांची खापरखेडा येथून मुंबई बदली करण्यात आली असून उपमुख्य अभियंता सुधीर राणे यांना कोराडी येथेच अतिरिक्त प्रभारी मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !