भुसावळात संरक्षण कामगारांनी पाळला काळा दिवस
Defense Workers Observe ‘Black Day’ in Bhusawal भुसावळ (1 एप्रिल 2026) : केंद्रीय कामगार महासंघाचे निर्देश व अखिल भारतीय संरक्षण महासंघाच्या आदेशा नुसार सरकारद्वारे कामगार कायद्यात बदलाव करून लागू करण्याच्या धोरणाविरोधात भुसावळातील आयुध निर्माणीत ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन व मजदुर युनियन इंटकच्या वतीने मुख्य द्वारावर निदर्शने करण्यात आली तसेच काळ्या फिती लावून विरोध दिवस/काळा दिवस पाळण्यात आला.
यांचा आंदोलनात सहभाग
बुधवार, 1 रोजी सकाळी मुख्य गेट वर सर्व युनियन पदाधिकार्यांनी उपस्थिती देऊन कामगारांना कामावर जाते वेळी काळे बिल्ले लावले तसे संपूर्ण दिवस काळे बिल्ले लाऊन कार्य केले व आंदोलनात सहभाग नोंदवला. कामगारांच्या या आंदोलनास सर्व कामगार स्टाफ च्या वतीने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कामगार युनियन अध्यक्ष आशिष मोरे, निलेश देशमुख, किशोर बढे, गजानन इंगळे, योगेश आंबेडकर, मीलेश देवराळे, मिलिंद ठोंबरे, ज्ञानदेव सरोदे, जावेद तडवी यांच्यासह मजदूर युनियन इंटक पदाधिकारी किशोर चौधरी, चेतन चौधरी, वसीम खान, जितु नेमाडेसह अन्य पदाधिकारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
विरोध दिवस कामगार युनियन महासचिव कॉ.दिनेश राजगिरे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आला.

अशा आहेत कामगारांच्या मागण्या
सरकारद्वारे कामगार कायद्यात केलेल्या बदलावचा विरोध तसेच कामगार विरोधी व उद्योगपतींच्या हित बघता तयार केलेले नवीन कायदे रद्द करावेत तसेच जुने कामगार कायदे पूर्ववत लागु करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.




