भुसावळातील स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे ट्रॉफीवर सेंट अलॉयसिस क्रिकेट संघाचे वर्चस्व
St. Aloysius Cricket Team Dominates the Late Dadasaheb N.K. Narkhede Trophy in Bhusawal. भुसावळ (1 एप्रिल 2026) : शहरातील रेल्वेच्या मैदानावर आयोजित स्वर्गीय दादासाहेब एन. के. नारखेडे आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात सेंट अलायसिस हायस्कूलच्या संघाने ताप्ती पब्लिक स्कूलच्या संघावर चार धावांनी रोमहर्षक विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावे केली. ताप्ती संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेंट अॅलॉयसीस संघाने सर्वबाद 104 धावा करत 105 धावांचे लक्ष्य ताप्ती स्कूलला दिले.पण ताप्ती पब्लिक स्कूलच्या संघाला 100 धावांवरच रोखत स्वतःकडे विजयश्री खेचून आणली. संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारर्या सेंट अॅलॉयसीस संघाचा रुद्र चौधरी हा उत्कृष्ट फलंदाज तर छायेश जाधव हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
मेहनत करण्याचा खेळाडूंना आवाहन
टुर्नामेंट चे आयोजक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य भाग्येश नारखेडे यांनी या टुर्नामेंटच्या आयोजनामागे असलेला हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर जाऊन खेळण्याइतपत सराव आणि मेहनत करण्याचा संदेश दिला, जेणेकरून भुसावळचे नाव राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचेल.

धावफलक-अंतिम सामना
सेंट अलोयसिस विरुद्ध ताप्ती पब्लिक स्कुल.
सेंट अलॉयसीय स्कुल, भुसावळ- 104/10
रुद्र 24 धावा , छायेश 19 धावा,
योजित 3 बळी, संमेद 2 बळी, रुद्राक्ष 2 बळी.
ताप्ती पब्लिक स्कुल 100/10
रुद्राक्ष 23 धावा, संमेद 17 धावा,
अंश 2 बळी, रुद्र 2 बळी.
काही अंशी एकतर्फी वाटणारा आणि ताप्ती स्कूलच्या हातात असलेला हा सामना शेवटच्या काही मिनिटात अतिशय चिकाटीचा खेळ खेळत सेंट अलॉयसीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः खेचून आणला आणि विजयश्री मिळवली. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सामना संपल्यानंतर बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सहभागी झालेल्या चार संघांना सहभागी होण्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विजेत्या संघाला व उपविजेत्या संघाला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे सदस्य भाग्येश नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सभासद विकास पाचपांडे, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, दोन्ही संघांचे कोच व अंपायर्स इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला यथोचित गौरविण्यात आले.
या क्रिकेट टूर्नामेंटसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे व मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सुहास चौधरी तर आभार मनोज तडवी यांनी मानले. टूर्नामेंट यशस्वी करण्यासाठी संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, मनोज तडवी, शैलेंद्र महाजन, प्रदीप सपकाळे, निलेश नेहेते, अनिल जटाळे, सुहास चौधरी, माधव गरुडे, विनायक खडसे, नवीन नेमाडे, विनोद सोनवणे, शशिकांत झांबरे, गोविंदा पाटील, मिलिंद बोंडे, किरण पारधी आदींनी परिश्रम घेतले.




