भुसावळ शहरात उद्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन


भुसावळ (1 एप्रिल 2026) : हनुमान जनोत्सवाचे औचित्य साधून शहरातील त्यागमूर्ती राजेंद्र दायमा प्रतिष्ठान व हम हैं श्याम के दिवाने मंडळातर्फे जामनेर रोडवरील टीव्ही टॉवरजवळील केळकर हॉस्पीटलजवळ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान व श्याम बाबाच्या नावाने आयोजित या कीर्तन सोहळ्यात गायक अमित पारिक मक्सी व साची पुरोहित (नागपूर) आपल्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सादर करणार आहेत. भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !