पॅट परीक्षेच्या दिवशीच राज्यातील सर्व शाळांची होणार पटपडताळणी
भुसावळ (2 एप्रिल 2026) : राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ,महेश पालकर यांच्या साहिनीशी शिक्षण संचालनालय,पुणे यांनी 31 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार आता राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन पटपडताळणी करण्याबाबत तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या परिपत्रकानुसार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही ,बोर्डाच्या परीक्षेतील त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती हीच संख्या ग्राह्य धरण्यात येईल.



11वी तील विद्यार्थ्यांची ,मराठी,इंग्रजी, व भौतिक शास्त्र ह्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी होईल
2री ते 8वी च्या विद्यार्थ्या ची पटपडताळणी पॅट परीक्षेच्या दिवशी म्हणजे दिनांक 11 एप्रिल26,दिनांक 15 एप्रिल 26 आणि दिनांक 22 एप्रिल 26 ह्याच तारखाना होईल
9वी तील विद्यार्थ्यांची पटपडताळणी सुद्धा उपरोक्त तारखानाच होईल
11 वी च्या विद्यार्थ्यांची मराठी,इंग्रजी व भौतिक शास्त्र विषयांचा पेपर उपरोक्त तारखानाच होईल
परिपत्रकानुसार आता शाळांना परीक्षेचे वेळापत्रक ठरविताना वरील प्रमाणे पॅट परीक्षांच्या तारखा लक्षात ठेवूनच नियोजन करावे लागणार आहे वरील तीन तारखाना राज्यातील सर्व शाळांतील पटपडताळणी एकच वेळी होऊन खोट्या पट संख्येला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न ही या मागील कारण असल्याची माहिती ज्येष्ठ शिक्षक नेते प्र.ह.दलाल यांनी दिली.





