रेवा कुटीमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
441 हनुमान चालीसा पाठ, हवन, यांचे नियोजन
Hanuman Janmotsav Celebrated at Reva Kuti वरणगाव (2 एप्रिल 2026) : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी वरणगाव याठिकाणी वासुदेव परिवार तर्फे विविध उपक्रमांनी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 5 वाजता गणेश आराधना,प्रभु श्री राम स्तुती नंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे पठण सोबत हवन करण्यात आले.
यावेळी प्रत्येकी 11 असे हनुमान चालीसाचे एकूण 441 सामूहिक संगीतमय पाठ करण्यात आले. सोबत हनुमान चाळीसा प्रत्येक ओवीचे हवन करण्यात आले.,एकूण 16880 हवंन आहुती देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तुकाराम पाटील,वैशाली पाटील, पेचिमुत्थु नाडर,सिल्वराणी नाडार,डॉ.रवींद्र माळी,विवेक पाटील,सुलोचना पाटील,डॉ. रेणुका पाटील, दिपक फेगडे, मनोज गोसावी,उमेश माळी, कमलेश येवले,कुणाल शिंदे ,ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत बढे, बाळकृष्ण चव्हाण,दिनकर पाटील,प्रकाश पाटील, सुचिता येवले,सुनंदा येवले,प्रतीक बोरणारे, श्लोक बोरणारे, आशिष येवले,वेदांत पाटील,दुर्वांग पाटील, गौरी येवले, आशिष येवले,सतीश जंगले,राहुल माळी,सुनीता चौधरी, चेतन झोपे,आकाश भंगाळे,सारंग जोशी,अनिकेत चव्हाण,आदी आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते. आभार दीपक फेगडे यांनी मानले.



राम सेतू दगडाचे विशेष आकर्षण… कमलेश येवले
हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत आलेल्या भाविकांसाठी प्रभु श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राम सेतू दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.7 हजार वर्षापूर्वी घडलेल्या रामायणातील राम सेतू दगड अजूनही पाण्यात तरंगत असून भाविकांसाठी हा हनुमान जन्मोत्सव कायम स्मरणात राहणार आहे.या तीर्थाचे प्राशन करत सर्व भक्त आनंदी झाल्याचे कमलेश येवले म्हणाले.
भाविकांचा वाढता उत्साह संजीवनीसारखा : राहुल माळी
दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी सुरू केलेले संगीतमय हनुमान चालीसा पठणाला आता वर्षापूर्ती झाली आहे. भाविकांचा वाढता उत्साह आम्हाला संजीवनी सारखा आहे.आगामी काळात व्यापक नियोजन करू, असे सदस्य राहुल माळी म्हणाले.





