खाजगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत मागितली 12 लाखांची खंडणी : चौकडी पोलिसांच्या जाळ्यात


Extortion of ₹12 Lakhs Demanded Under Threat of Leaking Private Video: Quartet Caught in Police Net नाशिक (3 एप्रिल 2026) : व्यावसायिकाच्या टॅबमधील खाजगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत 12 लाखांची खंडणी उकळणार्‍या चौकडीला सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

काय घडले नाशिकमध्ये ?
तक्रारदार ज्येष्ठ व्यावसायीक असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिसमधील टॅब चोरीला गेला होता. या टॅबमध्ये त्यांच्या एका मैत्रिणीसोबतचे काही खाजगी व्हिडीओ होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयितांनी संबंधित व्यावसायिकाकडे 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागितली.



पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग
खंडणीखोरांनी या व्यावसायिकाला पैसे देण्यासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट 2 च्या पथकाने सापळा रचला. संशयित आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि चित्रपटाला शोभावा अशा ’सिनेस्टाईल’ पाठलाग करून चौघांच्या मुसक्या आवळल्या.

आधी खरात तर आता खंडणीने नाशिकमध्ये खळबळ
अशोक खरात प्रकरणामुळे नाशिक आधीच चर्चेत असताना, आता खंडणी आणि अश्लील व्हिडीओच्या या नवीन प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 10 हजार रुपये स्वीकारताना चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !