भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह नाशिकच्या आरोपीला बेड्या

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीद्वारे कारवाई


Nashik accused arrested with village axe and live cartridge in Bhusawal भुसावळ (3 एप्रिल 2026) : शहरातील श्रीराम नगर परिसरात एक संशयीत दहशतीच्या उद्देशापने गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर यंत्रणेने धाव घेत संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताच्या ताब्यातून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संदीप सुनील जाधव (23, रा.कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने शहरात गावठी कट्ट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील श्रीराम नगर परिसरात एक संशयीत दहशतीच्या उद्देशाने कट्ट्यासह आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने धाव घेत गुरुवार, 2 रात्री पावणेअकरा वाजता कारवाई करीत संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू राजू सांगळे, महिला उपनिरीक्षक भारती काळे, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल अमर अढाळे, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल जीवन कापडे, कॉन्स्टेबल दिलीप कोल्हे, कॉन्स्टेबल चंद्रकांत रायपूरकर, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !