शिरपूर पोलिसांची मोठी कामगिरी : चार लाखांच्या एमडी ड्रग्जसह स्थानिक आरोपी जाळ्यात
सहा लाखांची कार जप्त : अंमली पदार्थांची तस्करी ऐरणीवर
Major Breakthrough for Shirpur Police : Local Accused Nabbed with MD Drugs Worth ₹4 Lakhs शिरपूर (3 एप्रिल 2026) : मानवी मनावर परिणाम करणारा गुंगीकारक एम.डी.पदार्थाचा साठा शिरपूर शहर पोलिसांनी एका वाहनातून जप्त करीत स्थानिक आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिरपूरसारख्या शहरातही आता एमडी ड्रग्जची तस्करी होवू लागल्याने तस्करांच्या पाळा-मुळापर्यंत यंत्रणेने पोहोचावे, अशी अपेक्षा आहे. जयपाल प्रकाशसिंग गिरासे (राजपूत, रा.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूरातील संशयीत जयपाल गिरासे हा एमडी ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवार, 2 रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास सापळा रचण्यात आला. संशयीत कार (एम.एच.14 के.एफ.8682) आल्यानंतर तिची गुरुवारी साडेआठ वाजेच्या सुमारास पथकाने झडती घेतल्यानंतर त्यातून चार लाख 16 हजार 800 रुपये किंमतीचे एमडी जप्त करण्यात आले तसेच सहा लाख रुपये किंमतीची कारही जप्त करण्यात आली. आरोपी जयपाल प्रकाशसिंग गिरासे (राजपूत, 38 रा. पळासनेर ता.शिरपूर जि.धुळे, ह.मु.प्लॉट नं. 52, व्यंकटेश नगर, मांडळ शिवार, शिरपूर) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक संदीप दरवडे, सुरेश सोनवणे तसेच डी.बी.पथकातील हवालदार रवींद्र आखडमल, हवालदार अतुल पाटील, हवालदार सचिन माळी, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, प्रशांत बाविस्कर, उमेश पवार, गोपाल माळी, शांतीलाल पावरा, सतीष भामरे, सोमा ठाकरे, चालक रवींद्र महाले, जगन्नाथ माळी व होमगार्ड मिथुन पवार, राम भील आदींच्या पथकाने केली.






