‘जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ : भाईगिरीचे रिल्स बनवणार्‍यांचा भुसावळात पोलिसांनी उतरवला ‘माज’


‘Jalgaon District: A Stronghold of the Law’ — Police in Bhusawal Take Down the ‘Arrogance’ of Those Making ‘Gangster-Style’ Reels भुसावळ (3 एप्रिल 2026) : सोशल मीडियावर भाईगिरीचे रील्स बनवून व्हायरल करणार्‍यांचा गल्लीतील भाइर्ंंचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कायद्याने माज उतरवला असून त्यांच्याकडून ‘जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असल्याचे वदवून घेण्यात आले. खरे तर भुसावळ शहराची कॉस्मोपॉलिटीन व रेल्वे कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे मात्र अलीकडील काही काळात वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराचे नाव बदनाम झाले आहे. त्यातच काही रिल्स स्टार यांनी भाईगिरीविषयी रील्स सोशल मिडीयात व्हायरल केल्यानंतर पोलिस प्रशासनाने खातरजमा करीत सर्व रील्सस्टार भाईंना पोलिस ठाण्यात बोलावून कायदेशीर शब्दात समज दिली आहे.

तर यापुढे दाखल होईल गुन्हा
सोशल मिडीयात भाईगिरीचे रील्स टाकून वा व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणार्‍या तरुणांना भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी कायदेशीर शब्दात समज दिली तसेच यापुढे सोशल मिडीयात भाईगिरीचे प्रदर्शन वा उदात्तीकरण आढळल्यास संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही दिला आहे.



भुसावळातील अनेकांना बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोलावून कायदेशीर तंबी देत यापुढे ते असे रिल्स टाकणार नसल्याची तंबी देण्यात आली तसेच भुसावळात केवळ कायद्याचे राज्य असल्याचे व जळगाव जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे म्हणताना हे रिल्सस्टार दिसून येत आहेत.

रिल्स टाकल्यास खबरदार ! :पोलिस निरीक्षक राहुल वाघ
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वात यापुढेही सातत्याने सोशल मिडीयावर पोलिस यंत्रणेची करडी नजर असेल व भाईगिरीचे रिल्स व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे निरीक्षक वाघ म्हणाले. नागरिकांना काही आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्यास त्यांनी पोलिसांना सूचित करावे व तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही निरीक्षक वाघ यांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !