प्रवाशांनो लक्ष द्या : एलटीटी ते हटिया व एलटीटी ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या धावणार !


भुसावळ (3 एप्रिल 2026) : मध्य रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया साप्ताहिक विशेष (18 सेवा)
ट्रेन क्रमांक 08610 साप्ताहिक विशेष गाडी 22 एप्रिल ते 17 जून 2026 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर बुधवारी पाच वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसर्‍या दिवशी सायंकाळी सहा वाजता पोहोचणार आहे.



ट्रेन क्रमांक 08609 साप्ताहिक विशेष गाडी 20 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत हटिया येथून दर सोमवारी 4.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी 12.40 वाजता पोहोचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला ए एसी प्रथम, दोन वातानुकूलित द्वितीय, सात वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक जनरेटर डब्बे आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस- संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (
ट्रेन क्रमांक 01001 साप्ताहिक विशेष गाडी 21 एप्रिल ते 14 जून 2026 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवारी 8.15 वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसर्‍या दिवशी पाच वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01002 ही ’साप्ताहिक विशेष’ गाडी दिनांक 23 एप्रिल ते 16 जुलै 2026 या कालावधीत संतरागाछी येथून दर गुरुवारी 3.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर स्थानकावर थांबा असेल.

या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय, 10 वातानुकूलित तृतीय (इकॉनॉमी), 4 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 जनरेटर डब्बे असतील.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !