इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायजेशनच्या अध्यक्षपदी धीरज कुमार तर सचिवपदी निसार खान


Dheeraj Kumar appointed President and Nisar Khan as Secretary of the Indian Railway Ticket Checking Staff Organization. भुसावळ (3 एप्रिल 2026) : इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनाइजेशन (आयआरटीसीएसओ) च्या भुसावळ विभागीय कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच शहरातील रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात झाली. यावेळी अध्यक्षपदी धीरज कुमार तर सचिवपदी निसार अहमद खान यांची निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
मंडल वाणिज्य प्रबंधक बी.बी.तपस्वी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडीनंतर तपस्वी यांनी नूतन पदाधिकार्‍यांचा गौरव करीत रेल्वे प्रशासनासाठी अधिकाधिक महसूल वाढीसाठी उत्कृष्ट कार्याची अपेक्षा केली. यावेळी डीसीटीआय व आयआरटीसीएसओ जोनल सेक्रेटरी एस.पी.कांबळे उपस्थित होते.



यांचे निवडणुकीसाठी परिश्रम
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष असलम बेग मिर्जा, सह अध्यक्ष श्रीकांत वाघ, नासीर खान, पर्यवेक्षक हेमंत वेदपाठक यांचे सहकार्य लाभले तर राष्ट्रीय अध्यक्ष संजय सिंह यांनी नूतन कार्यकारिणीला स्वीकृती प्रदान करीत शुभेच्छा दिल्या व नूतन कार्यकारिणीने तातडीने पदभार स्वीकारण्यासह बँक खात्यांचे संचालनाचे अधिकार अध्यक्ष, सचिव और कोषाध्यक्ष यांना देण्यात आले असल्याचे जाहीर केले.

अशी आहे नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष-धीरज कुमार, सचिव- निसार अहमद खान, कार्यकारी अध्यक्ष- नरेंद्र डी.बाविस्कर, कोषाध्यक्ष- रंजीत कुमार शर्मा, आंतरिक लेखा परीक्षक- नितीन डी. लाजरस, उपाध्यक्ष- शेख इमरान, हनुमान प्रसाद मीना, आर.के.सिंह, कुमार गौरव, संयुक्त सचिव- शैलेंद्र कुमार, धर्मवीर कुमार, अनवर अहमद, अभिजीत वसंत साखरकर, संगठन सचिव- अश्विनी कुमार पासवान, विश्वजीत रॉय

कार्यकारी सदस्य असे- खेमराज मीना, उपेन्द्र कुमार, अशोक कुमार, विशाल प्रकाश शेलके, राजन कुमार, वीरेन्द्र चापरिया, ओमप्रकाश भारती, रकमराज मीना, शेख सलीम नैमुद्दीन, कविता डी.पवार, शेख जावेद शेख बिस्मिल्लाह, योगेश एस.भावसार, केतन उल्हासराव, रामकुमार मीना. दरम्यान, स्थानीय समन्वयक गुड्डू कुमार यांनी रेल्वे कर्मचार्‍यांचे आभार मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !