नाशिकमध्ये हळहळ : भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटूंबातील नऊ जणांचा मृत्यू


Tragedy in Nashik : Nine members of the same family killed after speeding car plunges into a well नाशिक (4 एप्रिल 2026) : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याबाहेर जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने एकाच कुटूंबातील नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांसह दोन महिलांचा समावेश असून एकाच कुटुंबातील पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला.

नियंत्रण सुटल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत असताना मारुती सुझुकी अर्टिगा (एम.एच.15 जे.एस.1053) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटताच ती रस्त्यावरून थेट विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.



यांचा ओढवला मृत्यू
मृतांमध्ये राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे आणि त्यांच्या चार नातेवाईकांचा समावेश आहे. मयत हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावचे रहिवासी होते.

दरम्यान, अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही मदतकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली मात्र तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !