मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला ; तुमचे आमदार-खासदार टीकून राहण्यासाठी लक्ष द्या

एकनाथ खडसेंवरही साधला निशाणा : म्हणाले, खुशाल माझी करा चौकशी


Minister Girish Mahajan takes a dig at Sanjay Raut: Focus on ensuring your MLAs and MPs remain intact. जळगाव (4 एप्रिल 2026) : जळगाव दौर्‍यावर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली होती तसेच मंत्री महाजन हे केवळ आमदार-खासदार फोडण्यासाठीचे संकट मोचक असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या टीकेवर आता मंत्री महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी त्यांच्या संपर्कातील आमदार-खासदार त्यांच्याकडे कसे टीकून राहतील, याकडे लक्ष द्यावे, असे महाजन म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंवरही जोरदार टीका केली.

काय म्हणाले मंत्री महाजन ?
गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय कसा होईल? यश कसे मिळेल? याकडे बघावे. आम्ही तर आमचे लोक परत घेणार नाही, पण तुम्ही तुमची मूठभर जे लोक आहेत ते सांभाळून ठेवा, असा टोला महाजन यांनी लगावला तसेच अजित पवार गटाकडून, शिंदे गटाकडून आमच्याकडे कोण येत आहेत, या राऊत यांच्या गोष्टींना लोक कंटाळले आहेत, असेही महाजन म्हणाले.



तर खडसेंनी खुशाल करावी तक्रार
आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी तक्रार करावी, कुठे डायरेक्टर आहे, कुठे मी पैसे लपवले आहेत, त्यांनी माझी तक्रार करावी. तुमची प्रत्येक आठवड्याला चौकशी होते, गुन्हे दाखल होत आहेत, ते तुम्ही बघा. लोकांच्या जमिनी खाऊन चालले, महार वतानाच्या जमिनी खाऊन चालले, हायवेमध्ये जमिनी घेतात, त्यांचे कार्यकर्ते लगेच झाडे लावतात. 136 कोटी रुपयांचा रॉयल्टीमध्ये तुम्हाला दंड झाल्याने आपण आपले बघा, माझ्याविषयी काही शंका असतील तर तुम्ही तक्रार करा, असे आवाहन महाजन यांनी दिले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !