धुळ्यात गावठी कट्टा, दोन काडतूसांसह ‘सलमान खान’ देवपूर पोलिसांच्या जाळ्यात


In Dhule, ‘Salman Khan’—armed with a country-made pistol and two cartridges—falls into the net of the Devpur police. धुळे (4 एप्रिल 2026) : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करणार्‍या शहरातील गुन्हेगाराला धुळे देवपूर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे अटक केली आहे. सलमान खान जावीद खान (20, वीटभट्टी, नुर मस्जीद जवळ, देवपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
देवपूर पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना धुळे शहरात देवपूर, एकता नगराकडे जाणार्‍या नदी किनारी एक संशयीत गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयीताला अटक करण्यात आली. पथकाला संशयीताला ताब्यात घेत त्याच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त केले. दरम्यान, आरोपी सलमान खान विरोधात धुळ्यातील देवपूर पोलिसात शस्त्र अधिनियम, घरफोडी आदी प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत.



यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस निरीक्षक समाधान वाघ, एपीआय बी.बी.पाटील, एएसआय मिलिंद सोनवणे, हवालदार किरण मेहरुणकर, हवालदार कैलास पाटील, कॉन्स्टेबल भटेंद्र पाटील, कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल सौरभ कुटे, कॉन्स्टेबल वसंत कोकणी, कॉन्स्टेबल शुभम बोरसे आदींच्या पथकाने केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !