कवडी मोल भावाने केळीची विक्री ; उत्पादक संकटात !


Banana Growers in Crisis as Prices Plummet to Rock-Bottom Levels ! भुसावळ (4 एप्रिल 2026) : पश्चिम आशियातील युद्धामुळे 90 टक्के केळी निर्यात ठप्प झाली असून 800 कंटेनर विविध बंदरांवर अडकल्याने साधारण सुमारे 16 हजार टन केळी खराब होत आहेत परिणामी दोन लाखाहून अधिक उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना देशांतर्गत बाजाराचा पर्याय उरला आहे. यामुळे केळीचे भाव नीचांकी पातळीवर आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत 1600 रुपये प्रतिक्विंटल विकली जाणारी केळी आता 400 ते 500 रुपयांना विकली जात आहेत. शेतकरी जनावरांना केळी खाऊ घालत आहेत.

हजारो टन बिकानेरी भुजिया अडकला
आखाती देशांमध्ये दरवर्षी 50 हजार टन बिकानेरी भुजिया आणि इतर पदार्थांची निर्यात होते मात्र युद्धामुळे सुमारे 100 कंटेनरची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. एका कंटेनरमध्ये 25 टन माल असतो. सध्या दुबई आणि इतर देशांमध्ये हे कंटेनर अडकून पडले आहेत. ‘बिकाजी फूड्स’चे व्यवस्थापक शंभुदयाल गुप्ता यांनी सांगितले की, दरमहा 15 ते 20 कंटेनर भुजिया, पापड आणि नमकीनची निर्यात केली जाते, जी सध्या बंद आहे. नोखा येथील प्रमुख निर्यातदार राजेश कुमार झंवर यांनी सांगितले की, आम्ही 850 डॉलर भाड्याने कंटेनर घेऊन जिरे, मेथी आणि भुईमुगाचे दाणे इराककडे पाठवले होते मात्र हा माल वाटेतच कुठे तरी उतरवण्यात आला आहे.


 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !