पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार


नाशिक (4 एप्रिल 2026) : अवघ्या पाच वर्षीय मुलीवर 24 वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 3 रोजी रात्री साडेआठ वाजता नाशिकमध्ये घडला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नाशिकमध्ये ?
नाशिकच्या खोडेनगर येथील एका बांधकाम साईटवर मध्य प्रदेशातील कुटुंब काम करते. याच साईटवर संशयितही कामाला आहे. पीडित मुलीचा भाऊ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने वडील आणि मुलगी सिव्हीलच्या आवारातच राहतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता वडील मुलीला कामावर घेऊन गेले. दुपारी 12 वाजता इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम करण्यास गेले होते. खाली मुलगी खेळत होती. संशयिताने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देत तिला इमारतीच्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केला.


रक्तस्त्राव झाल्याने मुलीच्या आईला लक्षात आली घटना
मुलीच्या शरीरीतून रक्त आल्याचे आईच्या लक्षात आले. तिला सिव्हीलमध्ये दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. रुग्णालयाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी रात्रीच परिसरात संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पीडित कुटुंब रोजगाराकरिता नाशिकमध्ये आले आहे. मजुरी करत हलाखीचे जीवन जगत आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच तिच्या आईला भोवळ आली होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !