दमानियांना मिळालेल्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? ; सुषमा अंधारेंचा सवाल


“How is it that not a single BJP member appears in the CDRs obtained by Damaniya?” — Sushma Andhare asks. मुंबई (4 एप्रिल 2026) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स सांगितल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सीडीआरमध्ये भाजपाचा एकही माणुस कसा नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे शिवाय दमानिया यांना सीडीआर कुणी पुरवले? असा प्रश्नही केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अंजली दमानियांनी खरातचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले ही चांगली गोष्ट आहे. पण ही गुप्त माहिती त्यांना पुरवतंय कोण? असा सवाल अंधारे यांनी केला. दमानिया म्हणतात की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला 17 कॉल केले होते. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे मात्र ज्यांनी खरातच्या ‘इशान्येश्वर’ मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि एक कोटींचा निधी मंजूर केला, त्यांच्या कॉलचा रेकॉर्ड का समोर आला नाही? या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसणे ही मोठी ‘गडबड’ वाटते.


सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की नाही ?
अशोक खरातच्या संपत्तीची आणि त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर का आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते, मग अद्याप गमे, आवारे आणि पोफळे यांना ताब्यात का घेण्यात आले नाही? एसआरए खात्यातील अधिकारी भांडे तिथे काय करत होते? सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की फक्त काही लोकांना राजकीयदृष्ट्या ‘डॅमेज’ करायचे आहे? असा घणाघात अंधारे यांनी केला.

रूपाली चाकणकरांवर पुन्हा निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली. चाकणकर यांना चौकशीचे समन्स निघाल्याची चर्चा असताना त्यांनी तीन दिवस मौन का बाळगले? मात्र, आता त्यांना कंठ फुटला आहे. या तीन दिवसांत त्यांनी तपास यंत्रणा ‘मॅनेज’ केल्या का? ’तपास यंत्रणा माझ्या हातात आहेत’, असा संदेश त्या देऊ पाहत आहेत का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. केवळ चाकणकर यांना लक्ष्य करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणामागील सुत्रधारांना शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !