महसूलमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले : भोंदू खरातला मदत करणार्‍या अधिकार्‍याला थेट बडतर्फ करणार !


The Revenue Minister stated unequivocally : Any official assisting the charlatan Kharat will be summarily dismissed! नाशिक (4 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या मोबाईल कॉलिंगचे सीडीआर काढण्यात आले असून त्यामध्ये दिग्गज नेते आणि काही अधिकार्‍यांचीही नावे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक खरातला मदत करणार्‍या अधिकार्‍यांची केवळ बदली नाही तर या अधिकार्‍यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले, बावनकुळे ?
अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राचा संस्कृतीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणी एसआयटी योग्य पद्धतीने कारवाई करत आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी एसआयटीला पुरावे द्यावेत. नाशिकच्या संस्कृतीला काळिमा फसण्याचा जे काम झालं आहे, त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकार्‍यांनी जर मदत केली असेल तर त्यांच्यावरदेखील कारवाई होईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यावर त्यांना नोकरीवर ठेवणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


‘त्या-त्या’ अधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवणार
अशोक खरात प्रकरणात कोणीही सुटणार नाही, याप्रकरणी एसआयटी तपास करत आहेत, त्यात ज्या-ज्या अधिकार्‍यांची नावे समोर येतील त्यांना कामावरून काढून टाकणार, असा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणार्‍यांवरही कारवाई करणार आहे. केवळ बदली नाही तर खरातला मदत करणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा स्पष्ट शब्दात इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय.

मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही
अंजली दमानियांकडे सीडीआर कुठून आले यासंदर्भात संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री कार्यालय, अशी माहिती देणार नाही, त्यांनी माहिती काढली असेल. हा प्रकार खूप संवेदनशील आहे त्यामुळे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालय देणार नाही. अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती आहे, त्यांनी ती एसआयटीकडे द्यावी. शिर्डी प्रकरणात माझ्याकडे सुनावणी लावली तर मी त्यावर निर्णय घेतो, दुष्कृत्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे बावनकुळे म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !