भुसावळात इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे उल्लेखनीय कार्य करणार्या रणरागिणींचा सन्मान
In Bhusawal, the Inner Wheel Club of Bhusawal Railcity honors women achievers for their remarkable contributions भुसावळ (5 एप्रिल 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे उंच माझा झोका या उपक्रमांतर्गत समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या व आदर्श निर्माण करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान करत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
यांचा झाला सन्मान
यावेळी पारुल त्रिवेदी व डॉ.सारयू विसपुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पारुल त्रिवेदी यांनी अत्यंत कठीण संघर्षातून पती हिरन त्रिवेदी यांच्या सोबत रिअल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत ‘एसेट वर्ल्ड’ ही कंपनी उभी केली व या माध्यमातून पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.


डॉ.सारयू विसपुते यांनी योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्या शतायु क्लिनिक अॅण्ड योगा सेंटरच्या संचालिका आहेत. त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे तसेच पहिल्या वर्ल्ड योगासन कपमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यांचे उपक्रमासाठी परिश्रम
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता व्याकोळे, प्रोजेक्ट चेअरमन रेवती मांडे तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबच्या खजिनदार डॉ.रश्मी शर्मा तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्याहस्ते पारुल त्रिवेदी व डॉ.सारयू विसपुते यांचा सत्कार करण्यात आला.





