भुसावळातील अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार : संशयीत तरुणाला अटक
Abduction and Sexual Assault of a Minor Girl in Bhusawal : Suspect Arrested भुसावळ (5 एप्रिल 2026) : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतरच्या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी जलद कारवाई करत मुलीसह संशयित आरोपीला ताब्यात घेतले तर पीडितेच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फूस लावून अल्पवयीनाला पळवले
उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाचा वेग वाढवला. शोधमोहीम राबवत पोलिसांनी मुलीचा ठावठिकाणा लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले तसेच संशयित आरोपीलाही अटक केली.


संशयीताला 6 पर्यंत पोलीस कोठडी
पीडित मुलीच्या जबाबानुसार, संबंधित आरोपीने फूस लावून तिला पळवून नेल्याबरोबरच तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित आरोपीला न्यायालयाने 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.





