मुंबई मंत्रालयात सहा लाख 37 हजारांची लाच घेताना अर्थ व नियोजन विभागाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Finance and Planning Department Official Caught in ACB Trap While Accepting a Bribe of ₹6.37 Lakhs at Mumbai’s Mantralaya मुंबई (6 एप्रिल 2026) : मुंबई मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील एका अधिकार्याला तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर लाचखोर हादरले आहेत.
मंत्रालयातील कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विलास लाड याच्यावर ग्रामविकास विभागाशी संबंधित निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. संबंधित काम मंजूर करून देण्यासाठी त्याने मोठी रक्कम मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.


तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नियोजनबद्ध सापळा रचला. नवी मुंबईतील खारघर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे आरोपी अधिकार्याने सहा लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या धडक कारवाईनंतर संबंधित अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्रालयातील कामकाजात लाचलुचपत उघडपणे होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मंत्री नरझरी झिरवाळाच्या कार्यालयातील कर्मचार्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यामुळे मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.





