बोदवड तालुक्यात चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


Two-wheeler rider killed in four-wheeler collision in Bodwad taluka बोदवड (6 एप्रिल 2026) : भरधाव मारुती ओमनी कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने तरुण ठार झाला. या अपघातात बोदवड तालुक्यातील चिंचखेडच्या 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. हा अपघात नांदगाव ते हिंगणे रस्त्यावर घडला अपघात प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला अपघात ?
समाधान सखाराम पाटील (38, रा.चिंचखेडसीम, ता. बोदवड) हे आपल्या दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.आर.1440) ने घरी परतत असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदगाव ते हिंगणे रोडवरील रामराव सीताराम पाटील यांच्या शेताजवळ मागून येणार्‍या मारुती ओमनी कारने (क्रमांक एम.एच. 19 सी.यू.1897) ने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने या भीषण अपघातात समाधान पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.


या प्रकरणी मयताचा पुतण्या योगेश गोविंदा पाटील (36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून चालकाचा शोध सुरू केला आहे. तपास हवालदारर संतोष चौधरी हे करीत आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !