वेळेत निदान आणि उपचार गरजेचे : रजनी सावकारे
महाराष्ट्रात प्रथमच उपक्रम : अँब्लियोपिया वर संपूर्ण तालुक्यात जनजागृती
भुसावळ (6 एप्रिल 2026) : लहानपणी वेळेवर दृष्टी तपासणी झाली तर पुढील संभाव्य मोठा दृष्टीदोष टाळता येतो त्यामुळे मनात कुठेही न्यूनगंड निर्माण होत नाही. उपचारापेक्षा प्रतिबंधक तपासणी ही जास्त महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष रजनीताई सावकारे यांनी आज केले.
शहरातील पुंडलिक गणपत बर्हाटे माध्यमिक विद्यालयात शहर आणि तालुक्यातील सर्व शासकीय, खाजगी शाळा, शासकीय रुग्णालय यांना दूर दृष्टी तपासणी चार्टचे वाटप भारतीय जनता पक्षाच्या स्थापन दिना निमित्ताने करण्यात आले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर तालुका शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, भुसावळ शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, तुषार प्रधान, भाजप शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, अर्चना सातदिवे, सीमा नरवाडे, प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, गिरीश महाजन, सुरज भोळे, जयश्री चौधरी, रामाशंकर दुबे आदी उपस्थित होते.
रजनी सावकारे म्हणाल्या की अँब्लियोपिया म्हणजे आळशी डोळा होय. ही लहान मुलांमधील दृष्टीची समस्या आहे, जिथे मेंदू आणि एका डोळ्यातील समन्वय कमी झाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी कमकुवत होते. बाह्यतः डोळा सामान्य दिसत असला तरी, चष्मा लावूनही त्या डोळ्याने स्पष्ट दिसत नाही.
हा आजार लहानपणीच निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु उपचार न केल्यास आयुष्यभर दृष्टीदोष राहू शकतो. यासाठी मा. ना.संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेनुसार आणि सौजन्याने संपूर्ण भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,खाजगी आणि निम खाजगी प्राथमिक ,माध्यमिक शाळेमध्ये व्हिजन टेस्टिंग चार्टचे वाटप करण्यात आले. सोबत शहर आणि तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयात देखील हे चार्ट वाटप करण्यात आले.
या मध्ये मराठी, इंग्रजी,डॉट,सी प्रकार आणि लहान मुलांसाठी प्राण्यांचे चित्र आहेत. चार्ट शाळेमध्ये कायमस्वरूपी लावला जाणार असून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहा मीटर वा वीस फुट अंतरावर उभे करून एक डोळा बंद करून चॅट वरील अक्षरे वाचायला लावायची. परत तीच प्रक्रिया दुसर्या डोळ्यासाठी करायची.जर त्यांना संपूर्ण व्यवस्थितपणे चॅट वाचला दृष्टी सदोष आहे आणि जर वाचण्यात अडथळा आला तर मग पालकांना पुढे योग्य अशा नेत्रतज्ञांकडून उपचार करून घ्यावे,असे सांगावे, असे निवेदन डॉ. नितु पाटील यानी प्रस्तावना मध्ये मांडले ,आभार प्रदर्शन हेमांगी चौधरी, तर सूत्र संचालन चैताली चौधरी,तुषार चिंधडे यांनी केले.
अँब्लियोपिया वर संपूर्ण तालुक्यात जनजागृती….
अँब्लियोपिया पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार नसला तरी, त्यामुळे होणारी कायमस्वरूपी दृष्टीहानी लवकर निदान आणि वेळेवर उपचारांद्वारे निश्चितपणे टाळता येऊ शकते. नियमित डोळ्यांची तपासणी हे सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक पाऊल आहे. या प्रयत्नांना यश आल्यास तालुका नक्कीच अँब्लियोपिया मुक्त दिशेने वाटचाल करेल, असे प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या.
महाराष्ट्रात सावकारे पॅटर्न गाजणार…डॉ. नितु पाटील
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आपल्या भुसावळ तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ना. संजय सावकारे यांचे प्रयत्न,संकल्पना, दूरदृष्टी आणि युवकांच्या नेत्र आरोग्याप्रति असलेली सजगता दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रमाची हळूहळू व्याप्ती वाढेल याबाबत मला खात्री असल्याचे डॉ.नितु पाटील म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक
सदोष दृष्टी असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. सदर चार्ट शाळेत कायमस्वरूपी लावला जाणार असून नियमित विद्यार्थी ची डोळे तपासणी होणार आहे. शाळेच्या मूल्यवर्धन प्रक्रियेला हा उपक्रम उपयोगी पडणार असल्याचे तालुका गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे म्हणाले.





