भोंदू खरातचा पाय खोलात : मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल


Fraudster Kharat in Deep Trouble : Case Registered in Money Laundering Scandal नाशिक (6 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढत्या असून आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातवर दाखल असणार्‍या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी हा गुन्ह दाखल केला आहे.

आतापर्यंत गुन्ह्यांची संख्या झाली 13
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी आठ गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा केल्याशी संबंधित आहेत तर इतर चार गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे. ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाचे दस्तावेज ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले? याचा तपास आता ईडी करत आहे.


बेहिशोबी मालमत्तांची माहिती रडारवर
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी अशोक खरातच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे. या तपासानंतर खरातच्या मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार रडारवर
अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह पाच जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहारात गुन्हा दाखल झाला असल्याने अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारासह मालमत्ता खरेदी – विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. साई संस्थानचा एक माजी विश्वस्तही यासंबंधी चौकशीच्या रडारवर आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !