52 हजारांची लाच अंगलट : दिंडोरीतील लाचखोर गटशिक्षणाधिकार्‍यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात


₹52,000 Bribe Backfires : Three, Including Corrupt Block Education Officer from Dindori, Caught in ACB Net नाशिक (7 एप्रिल 2026) : थकीत बिल काढण्यासाठी 52 हजारांची लाच मागून स्वीकारताना दिंडोरी, जि.नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षाधिकार्‍यांसह प्राथमिक शिक्षक व नाशिक जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ लेखा अधिकार्‍याला नाशिक एसीबीने अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अटकेतील आरोपींमध्ये दिंडोरी गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, निगडोळचे प्राथमिक शिक्षक निलेश निंबा भारती व नाशिक जिल्हा परिषदेचे कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील यांचा समावेश आहे.


असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक असून ते पेसा या विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. 2002 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या एकस्तर वेतनश्रेणीतील थकीत फरकाची रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी पंचायत समिती दिंडोरी येथे प्रस्ताव सादर केला होता. तक्रारदारांची सुमारे सहा लाख 57 हजार 808 रुपये तर त्यांच्या पत्नीची सहा लाख 55 हजार 600 रुपयांची थकीत रक्कम मंजुरीसाठी जिल्हा परिषद नाशिक येथे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती.

या प्रक्रियेदरम्यान संबंधित आरोपींनी बिल पुढे पाठविण्यासाठी व आवश्यक कार्यवाही करण्यासाठी लाचेची मागणी केली व नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपींनी एकूण 52 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हवालदार विनोद चौधरी व कॉन्स्टेबल अनिल गांगोडे आदींनी हा सापळा यशस्वी केला.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !