भोंदूबाबा खरातला कोर्टाचा दणका ; न्यायालयाने सुनावली कोठडी


Court Delivers a Blow to Charlatan Baba Kharat; Remanded to Custody नाशिक (8 एप्रिल 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरातला बुधवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

आरोपीला पुन्हा कोठडी
यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यानंतर बुधवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या वेळीही त्याला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी थेट त्याचे नाव विचारले. त्यानंतर दुसर्‍या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेतला गेला.


आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वकील उपस्थित होते. आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात हजर होते, तर सरकारी बाजू मांडण्यासाठी शैलेंद्र बागडे उपस्थित होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनीही न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान पुढील गुन्ह्यांमध्ये आरोपीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अशोक खरातला आता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले जाईल व त्यानंतर विशेष तपास पथक (डखढ) त्याचा पुन्हा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक कायदेशीर औपचारिकता आजच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तपास अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !