केज तहसीलदार राकेश गिड्डे भीषण अपघातात ठार

लातूर-अंबाजोगाई मार्गावर अपघात ; तरुण अधिकार्‍याच्या मृत्यूने हळहळ


Accident on Latur-Ambajogai Route; Young Officer’s Death Sparks Widespread Grief बीड (9 एप्रिल 2026) : लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली.

नियंत्रण सुटल्याने अपघात
गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना गुरुवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


रेणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते. पहाटेचा वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

कर्तव्यनिष्ठ आणि कामसू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या अकाली जाण्याने महसूल विभागाला मोठा धक्का बसला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !