तीन पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन : समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण


Suspension of Three Police Personnel: ‘This’ Shocking Reason Comes to Light पुणे (9 एप्रिल 2026) : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शारीरिक संबंधांच्या रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आयटी अभियंता तरुण-तरुणीकडून 10 हजार रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस हवालदार किरण अब्दागिरी, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

आयुक्तांकडून गंभीर दखल
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करत तपास केला. तपासाअंती या तीनही पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.


 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !