वासनांध भोंदू खरातचा नवा कारनामा समोर : जमीन खरेदीत शेतकर्‍यांची फसवणूक


New Misdeed by Lust-Crazed Charlatan Kharat Exposed : Farmers Defrauded in Land Purchase नाशिक (9 एप्रिल 2026) : नाशिकचा वासनांध भोंदू अशोक खरातविरोधात नव्याने एक गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने एका शेतकर्‍याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपी अशोक खरातविरोधात चौदावा गुन्हा सिन्नर पोलीस (डळपपरी ठाण्यात दाखल झाल्याने भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

शेतकर्‍याची केली लूट
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर पोलीस ठाण्यात मिरगाव येथील जमीन खरेदी करून शेतकर्‍यांची लूट केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर 2003 ते फेब्रुवारी 2004 दरम्यान अशोक खरातने मिरगाव येथील जमीन खरेदी करत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात आणि कल्पना खरातवर फसवणूकीसह जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


ईशान्येश्वर मंदिर, खरातचे फार्म हाऊस आणि आंब्याची बागसह इतर असलेली शेती नावावर करून शेतकर्‍यांची लूट केल्याची माहिती आहे. तुमच्या शेतजमिनीवर मंदिर उभारायचे असून माझ्याकडे दैवी शक्ती असल्याची बतावणी अशोक खरातनं केली होती.

मंदिर उभारणीला विरोध केला तर तुमच्यावर जादूटोणा करून तुमच्या सर्वाचा नाश करेल, अशी धमकी जमिनी मालकांना धमकी दिली होती तर अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांनी 2004 साली एकूण 16.50 एकर जमीन 15 लाख रुपयात खरेदी केल्याने खरातच्या इतर कारनाम्यासह सिन्नरच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर जमीन खरेदीची देखील चौकशी होणार आहे.

भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार
भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसर्‍या गुन्ह्यात त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकार्‍यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्या ऐवजी तिसर्‍या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे दुसर्‍या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन एसआयटीने पुन्हा तिसर्‍या गुन्ह्यत त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला तिसरा गुन्हा ही महिलचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर त्याने अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची प्रसुती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल, असे सांगत महिलेवर अत्याचार केला आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती, याच अत्याचारच्या घटनेनंतर खरातचे बिंग फुटले आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !