चोपड्यातील चित्रकाराने स्टीपलिंग पद्धत्तीने साकारले स्व.मेजर रॉबर्ट गील यांचे छायाचित्र
चोपडा (9 एप्रिल 2026) : जागतिक अजिंठा लेणीचा शोध लावणार्या स्व.मेजर रॉबर्ट गील यांची शुक्रवार, 10 एप्रिल पुण्यतिथी असल्याचे औचित्य साधून चोपडा येथील चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांनी स्व.मेजर रॉबर्ट गील यांच्या जीवनावर आधारित पेन इंकच्या साह्याने स्टिपलिंग पद्धतीने छायाचित्र रेखाटली आहे. स्व.गील यांना या छायाचित्राच्या माध्यमातून त्यांनी चित्रांजली देऊन अभिवादन केले आहे. या चित्रात रॉबर्ट गीलल यांचे समाधी स्थळ दाखवून मागच्या बाजुला अजिंठा लेणी दर्शवण्यात आली आहे.







