भोंदू अशोक खरातच्या कृत्याबाबत 160 जीबी डेटा जप्त : पुराव्यामुळे पाय अधिक खोलात


160 GB of Data Seized Regarding the Actions of Imposter Ashok Kharat: Evidence Lands Him in Deeper Trouble नाशिक (10 एप्रिल 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी 160 जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केल्याने खरातच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर केला आहे.

तपास पथकाच्या हाती लागला डेटा
तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांमधून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमध्ये 32 जीबी क्षमतेचा डेटा, त्यात 19 स्वतंत्र फोल्डर तसेच 64 जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह आणि एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व उपकरणांमधील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बारकाईने तपासली जात आहे. या सर्व मिळून 160 जीबीपेक्षा अधिक डेटा तपास पथकाच्या हाती लागला आहे.


प्रत्येक पुराव्याचे वर्गीकरण
या डिजिटल पुराव्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी उघड होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याला वेगळे कोडवर्ड दिले असून ए, बी, सी अशा स्वरूपात त्यांचे वर्गीकरण केले आहे.

या प्रकरणात साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले असून, न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित संकलित केले जात आहेत. डिजिटल पुराव्यांमधील माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक बळकट होत आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा विस्तार वाढत असून, आणखी नवे पैलू समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !