उधना-मालदा टाउन व एलटीटी-हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी धावणार ; भुसावळसह ‘या’ स्थानकांवर थांबे
भुसावळ (10 एप्रिल 2026) : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी उधना-मालदा टाउन व एलटीटी-हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
उधना ते मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी (32 सेवा)
ट्रेन क्रमांक 09033 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 9 एप्रिल ते 23 जुलै 2026 या कालावधीत उधना येथून दर गुरुवारी रात्री 11 वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसर्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 09034 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 14 एप्रिल 2026 ते 26 जुलै 2026 या कालावधीत मालदा टाउन येथून दर रविवारी 9.30 वाजता सुटेल आणि उधना येथे तिसर्या दिवशी01.20 वाजता पोहोचेल. (16 सेवा)
या गाडीला नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, दोन सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा विशेष गाडी (2 सेवा)
ट्रेन क्रमांक 01145 विशेष गाडी 14 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 8.15 वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसर्या दिवशी सकाळी सहा वाजता पोहोचेल. (1 सेवा)
ट्रेन क्रमांक 01146 विशेष गाडी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी हावडा येथून 14.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. (1 सेवा)
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर आणि सांतरागाछी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय, नऊ वातानुकूलित तृतीय, तीन शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.






