घरात जळालेल्या नोटा आढळल्याने आले चर्चेत : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा
In the Spotlight After Burnt Currency Notes Were Found at His Residence: Justice Yashwant Verma Resigns प्रयागराज (10 एप्रिल 2026) : दिल्लीतील घरात लागलेल्या आगीत 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल जळालेल्या अवस्थेत आढळल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (57) हे चर्चेत आल्यानंतर त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला आहे.
शपथविधी घेतला मात्र जवाबदारी नाही
दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात न्या.वर्मा यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी 5 एप्रिल 2025 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात शपथ घेतली मात्र त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना न्यायिक कामांपासून दूर ठेवण्यात आले होते.

रोख रकमेच्या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. न्यायमूर्ती वर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध आणलेल्या महाभियोग प्रस्तावाला आव्हान दिले होते. याचिकेत म्हटले होते की, दोन्ही सभागृहात महाभियोग प्रस्ताव आणला गेला होता परंतु राज्यसभेने त्याला मंजुरी दिली नाही. असे असूनही, लोकसभेने एकट्याने चौकशी समिती स्थापन केली, जे त्यांच्या मते चुकीचे आहे.
त्यानंतर याचवर्षी 6 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, चौकशी समितीच्या स्थापनेत काही त्रृटी दिसून येतात. तथापि, ही त्रृटी इतकी गंभीर आहे का की संपूर्ण कार्यवाही रद्द केली जावी, हे न्यायालय पाहिल.
सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी रोजी यशवंत वर्मांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवसांच्या सुनावणीनंतर हा निर्णय घेतला. तथापि, खंडपीठाने न्यायमूर्ती वर्मा यांना संसदीय समितीसमोर उत्तर दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला.
घरात आढळल्या जळक्या नोटा
14 मार्च 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सरकारी बंगल्याला आग लागली. तेथे अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना जळलेल्या 500 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या गोण्या मिळाल्या होते.






