भीषण रस्ते अपघातात पोलिस कर्मचार्‍याच्या कुटूंबातील चौघे ठार


Four members of a police officer’s family killed in a horrific road accident छत्तीसगड (10 एप्रिल 2026) : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण रस्ते अपघातात कॉन्स्टेबल मुनेंद्र नेताम यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 30 वर हा अपघात घडला.

असा घडला अपघात
उडाकुडा येथील रहिवासी असलेले नेताम कुटुंब गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजता चिवरंज येथील एका लग्नाहून परत येत होते. नथिया नवगावजवळ त्यांच्या गाडीची दुसर्‍या गाडीला धडक बसली. धडकेचा परिणाम इतका भीषण होता की, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये मुनेंद्र नेताम यांच्या पत्नी कुंती नेताम, जावई शगुंदास नेताम, बहीण मक्तुला नेताम आणि 7 वर्षांचा भाचा वंश नेताम यांच्यासह दोन नातेवाईकांचा समावेश आहे. अपघातात दोन्ही वाहनांमधील तीन जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना रायपूर येथे दाखल करण्यात आले. या धडकेत दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. दुसर्‍या गाडीतील दोन तरुण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कार भरधाव वेगात होती आणि ट्रक ओव्हरटेक करत असताना समोरून येणार्‍या स्विफ्ट डिझायरला धडकली.

रायपूरमध्ये 3 जखमींवर उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एसपी निखिल राखेचा यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दोन्ही वाहनांमधील तीन जखमींना रायपूरला पाठवण्यात आले आहे. एसपींनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग 30 वर दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !