पत्नीपीडित तरुणाची आत्महत्या ; पोस्टमध्ये लिहिली डॉक्टर अन वकिलांची नावे
Young Man Tormented by Wife Commits Suicide; Names of Doctor and Lawyer Written in Post परळी (11 एप्रिल 2026) : सोशल मिडीयावर पोस्ट टाकत पत्नीपासून त्रस्त तरुणाने आत्महत्या केली. ही घटना नागापूर (ता.परळी) येथे घडली. रामेश्वर गव्हाणे (27) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पोस्ट टाकली असून त्या पोस्टमध्ये परळी शहरातील डॉक्टर व वकिलांची नावे आहेत.
झाडाला घेतला गळफास
रामेश्वर गव्हाणेची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. दुपारी चार वाजता नागापूर शिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. पोस्टमध्ये माझे लग्न मनाविरुद्ध लावून दिल्यानंतर पत्नीकडून मारहाण व इतर त्रास सुरू झाला. ती गरोदर असल्याचे भासवले. यात अंबाजोगाईच्या डॉक्टरचा सहभाग होता. टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. तेथील वकिलाने माझे लग्न लावून फसवणूक केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये आहे. या सर्वांवर कारवाई करावी, अशी इच्छा त्याने पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

रामेश्वरच्या पोस्टमध्ये काय?
रामेश्वर गव्हाणे याने पोस्ट करत म्हटलंय की, आई आणि सुरेखा मला माफ करा मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. यापूर्वी ही ती मला मारहाण करून उखळीला गेली होती. तिने मला मारहाण केली तरी मी तिला काहीही केले नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत.
या आधीच तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरीजनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही तरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला टच करते. चिमकुरे घेते, माझ्या जेवण मीठ, चटणी, मसाला जास्त टाकते अजून दुसरं काही तरी मिक्स करते ज्यामुळे मला काहीच कळत नाही काय होतं आहे ते. गेल्या दोन वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करणं. स्वयंपाक जास्त करून ठेवणं असे पोस्ट करत म्हटले आहे.






