अंजली दमानियांचा दावा : अशोक खरातच्याही जिवाला धोका !


Anjali Damania Claims : Ashok Kharat’s Life Also in Danger! मुंबइ (11 एप्रिल 2026) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल, असे विधान केल्याचा आम्हाला सुद्धा तीच धास्ती असल्याचे दमानिया म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या दमानिया ?
अशोक खरात प्रकरण मिटवण्यासाठी जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे यात काहीच शंका नाही. खरातला इतक्या गोष्टी माहिती असाव्या की ते बाहेर येऊ नये म्हणून खरातचे काही बरे वाईट केले जाईल ही भीती त्याच्यासह आम्हा सर्वांना आहे. प्रकरण दाबायचे असेल तर त्याच्या जीवाचे काही बरे वाईट करत फाईल बंद करण्यात येईल. हे होऊ नये म्हणून त्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. राज्यात रोज नव्या भोंदू बाबांचे प्रकरणे समोर येत आहेत, आपण काय करतो आहोत, असा प्रश्न पडला आहे.

चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका
राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलिस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !