वाडेतील शेतकर्‍याची किमया : पाच एकर शेतीत वर्षभरात घेतात 18 प्रकारचा भाजीपाला ; सरासरी 28 लाखांचे उत्पन्न

दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा अन पिकांना गोमुत्र, ताक, बिजामृत ः वाडे येथील हर्षल पाटील या शेतकर्‍याची बनली कहाणी : इंजिनियरींग ते उद्योजकता एक धाडसी प्रयोग


भडगाव (11 एप्रिल 2026) : भडगाव तालुक्यातील वाडे येथील हर्षल अशोक पाटील या तरुणाने इंजिनियरची नोकरी सोडुन आपल्या शेती मातेत कष्ट करुन पारंपारीक शेती पिकांसोबतच 5 एकर क्षेञात कारले, गिलके,दोडके, गवार, भेंडी, वांगे, मिरची यासह विविध 18 प्रकारचा भाजीपाला लागवड वर्षभरात दोन प्लॉटमध्ये केलेला आहे. विशेष म्हणजे या भाजीपाल्यावर रासायनिक खते वा औषधी फवारणी न करता नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. सोबतच 135 गिरगाई असुन शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसाय म्हणून जोडधंदा सुरु आहे मात्र दुध विक्री न करता तुप बनवुन विक्री करतात. तसेच गायींचे गोमुत्र, ताक, जिवामृत,बिजामृताचा वापर भाजीपाल्याला होतो. गुळ व सोडा ठिबक सिंचनातुन देतात. अतिशय चांगला उत्कृष्ट ताजा भाजीपाला काढुन वाडे ते धुळे येथे जवळपास 60 कि. मी. अंतर कापुन व्हाटसपच्या माध्यमातुन भाजीपाला ग्राहकांना घरपोच दिला जातो.

गायींचे दुध पासुन तुप काढुन विक्री केला जातो. 5 एकर भाजीपाल पिकाला वर्षातुन जवळपास 2 ते 3 लाखांपर्यंत खर्च येतो. माञ वर्षभरातुन जवळपास 14 ते 15 लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न हातात येते. दुग्धव्यवसायाला वार्षीक खर्च 7 लाखांपर्यंत येतो. माञ निव्वळ उत्पन्न जवळपास 13 लाखांपर्यंत येते. भाजीपाला व दुग्धव्यवसाय मिळुन जवळपास 27 ते 28 लाख रुपये निव्वळ वार्षीक उत्पन्न हाती येते. या शेतकर्याचा जवळपास 5 वर्षापासुन हा प्रयोग सुरु आहे. अशी वाडे येथील हर्षल अशोक पाटील या इंजिनियर नोकरी सोडुन शेती मातेची सेवा करणार्या शेतकर्याची जणु विक्रमी उत्पन्नाची कहाणीच बनलेली आहे. इंजिनियरींग ते उदयोजकता एक धाडसी प्रयोग. असा हा अनोखा प्रयोग पहाण्यासाठी त्यांच्या शेतात शेतकरी नेहमी जातात. हा शेती अनोखा उपक्रम शेतकर्यांसाठी जणु प्रेरणादायी ठरतांना दिसत आहे.

भडगाव तालुक्यातील वाडे येथील शेतकरी व धुळे येथे असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक डिगांबर पाटील यांच्याकडे एकुण 15 एकर शेती आहे. त्यांनी सुरुवातीपासुन केळी, दादर, ज्वारी आदि पारंपारीक पिके घेतली. धुळे येथुन वाडे गावी शेतीसाठी जवळपास 60 कि. मी. अंतर कापीत सालदार गडी वा शेतमजुरांकडुन शेती कसलेली आहे. माञ त्यांचा मुलगा हर्षल पाटील हा बीई अ‍ॅटोमोबाईल इंजिनियर झाला. त्याने नोकरी सोडुन शेती कसण्याकडे लक्ष दिले. धुळयाहुन वाडे येथे वाहनाने प्रवास करुन शेती पारंपारीक पिकांसोबत 5 एकर क्षेञा भाजीपाला लागवड सुरु केली. 135 गिरगाई आणुन शेतीव्यवसायाला दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा सुरु केला.

नैसर्गिक भाजीपाला शेती वर्षातुन 2 वेगवेगळया टप्यात सुरु केली. आंतरपिक नुसार मल्चिंग पेपर जमिनीवर आंथरुण भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनची सोय केली. मंडप पद्धतीने ही भाजीपाला लागव केली. भाजीपाल्याचा अडीच एकर क्षेञात नोव्हेंबर 2026 मध्ये भाजीपाला लागवड केली. तर दुसरी भाजीपाला लागवड अडीच एकर क्षेञात फेब्रुवारी 2026 मध्ये केली. यात कारले, गिलके, दोडके, भेंडी, गवार, मिरची, वांगे, टमाटे, बोकोली, भेंडस,वाल, चवळी, बिम्स, दुधी भोपळा, टरबुज, कोबी आदि 18 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली. विशेष म्हणजे या भाजीपाल्याला ना रासायनिक खते ना औषध फवारणी केली नाही. नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला शेती जवळपास 5 वर्षापासुन त्यांनी सुरु केलेली आहे. गिरगाईच्या गोमुञ, ताक, जिवामृत,बिजामृत चा वापर भाजीपाला पिकाला केला जातो. गुळ व खाता सोडा ठिबक सिंचन मार्फत भाजीपाला पिकाला देतात. सर्व प्रकारचे बॅक्टरीया भाजीपाला पिकासाठी वापरतात. विषमुक्त अन ताजा, उत्कृष्ट प्रकारचा पिकविलेला भाजीपाला ग्राहकांना धुळे येथे नेऊन घरपोच विकला जातो. हा भाजीपाला विक्रीसाठी व्हॉटसअ‍ॅप ग्रुप बनविलेला आहे.

ग्राहकांसोबत जवळपास 40 डॉक्टर हा भाजीपाला बाजार भावाप्रमाणे खरेदी करतात. ग्राहकांना विषमुक्त अन चांगला भाजीपाला मिळतो. कॅन्सरमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्धेशाने नैसर्गिक शेती करुन भाजीपाला पिकवुन विकला जातो. अशी माहिती हर्षल पाटील या शेतकर्याने दै. लोकमतशी बोलतांना दिली.

135 गिरगाईंचे पालनही शेतात केले जाते. दररोज 135 ते 140 लिटर दुध काढले जाते. हे दुध दररोज वाडे गावाहुन धुळयाला नेले जाते. या दुधापासुन तुप तयार करुन तुपही विक्री केले जाते.

अशी आधुनिक शेती करुन शेती भाजीपाला व्यवसाय अन त्याला जोडधंदा दुग्ध व्यवसाय अशा या अनोख्या उपक्रमाचे या शेतकर्याचे कौतुक होत आहे. कोण म्हणतं शेती परवडत नाही. हे दाखवुन दिले आहे. दररोज वाडे ते धुळे 60 कि. मी. अंतर दररोज पार करुन. यामुळे शेतकर्यांसह पशू पालकांसाठी हा अनोखा उपक्रम प्रेरणाई ठरतांना दिसत आहे.

शेतकरी म्हणाला, वर्षभरात 28 लाखांचे उत्पन्न
आमच्याकडे एकुण 15 एकर जमिन आहे. केळी, दादर, ज्वारी या पारंपारीक पिके घेण्यासोबतच 5 वर्षापासुन 5 एकर क्षेञात नैसर्गिक पद्धतीने एकुण 18 प्रकारचे विविध भाजीपाला मंडप पद्धतीने लागवड केलेला आहे. वर्षभरात 5 एकर साठी 2 ते 3 लाखांपर्यंत मजुरी आदि खर्च येतो. माञ भाजीपाल्याचे निव्वळ उत्पन्न 14 ते 15 लाखांपर्यंत हाती येते. गायींचे गोमृञ, ताक, जिवामृत, बिजामृतचा वापर भाजीपाला पिकाला केला जातो. रासायनिक खते वा औषध फवारणीचा खर्च टळतो. तसेच आमच्या कडे 135 गिरगाई आहेत. दररोज 135 ते 140 लिटर दुध निघते. या दुधापासुन तुप तयार करुन धुळे येथेच विक्री केला जातो. गायींचे पालनासाठी वा मजुर आदि वर्षभरात 7 लाखांपर्यंत खर्च येतो. माञ वार्षिक निव्वळ उत्पन्न 13 लाखांपर्यंत हाती येते. तर भाजीपाला व्हाटसप गृपच्या माध्यमाने घरपोच विकला जातो. यात इतर ग्राहकांसोबतच 40 डॉक्टरही नेहमी हा भाजीपाला घेतात. भाजीपाला व दुग्धव्यवसायातुन तुप विक्री असे वर्षभरातुन जवळपास 28 लाखांचे उत्पन्न हातात मिळते, असे शेतकरी हर्षल अशोक पाटील म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !