भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
भुसावळ (11 एप्रिल 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दीप म्हणजे शिक्षण
यावेळी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी मार्गदर्शनात सांगितले की, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप म्हणजे शिक्षण आणि त्या दीपाची ज्योत प्रत्येक स्त्रीच्या हातात देणारे महात्मा फुले. ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा हक्क नाकारला जात होता, त्या काळात महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांच्या या महान कार्यामुळे आजची स्त्री आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि सक्षम बनली आहे. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीशी महात्मा फुलेंची विचारधारा उभी आहे. त्यांनी दाखवलेला समानतेचा मार्ग हा प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारा आहे. आजच्या या पवित्र दिनी, प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे आणि समाज घडवण्यात आपला मोलाचा वाटा उचलला पाहिजे, हेच खरे त्यांना अभिवादन आहे. शिका, संघटित व्हा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा असा मंत्र दिला.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.डॉ.पी.आर.गवळी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.श्रेया चौधरी, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.एस.पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






