भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात


भुसावळ (11 एप्रिल 2026) : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ विभाग, कनिष्ठ विभाग व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.जीवन धांडे होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेंद्र नाडेकर, भुसावळ विभागाचे रासेयो समन्वयक व डॉ.रुपेश मोरे उपस्थित होते. प्रा.डॉ.राजेंद्र नाडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाच्या विशेषता सांगितल्या व त्यांच्या विचारांची आजच्या काळात आवश्यकता नमूद केली. डॉ. रुपेश मोरे यांनी महात्मा फुले यांनी केलेले सामाजिक कार्य व त्यातूनच समाजाचा उद्धार झाला आहे असे नमूद केले.

याप्रसंगी वरिष्ठ विभाग रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.मीना चौधरी यांनी सूत्रसंचालन करून आभारही मानले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.निलेश गुरचळ रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !