एटीएममधून पैसे काढताना सावधान ! भडगावात वृद्धाला सव्वा लाखांचा गंडा
Caution When Withdrawing Money from ATMs! Elderly Man Duped of ₹1.25 Lakhs in Bhadgaon. भडगाव (11 एप्रिल 2026) : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका अनोळखी भामट्याने वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून एकलाख 20 हजार 81 रुपये लांबवले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
रक्कम काढताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
रतन वना पाटील ( 87, रा. वडगाव बु.॥, ता. भडगाव) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ते 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान शहरातील बडे सर कॉम्प्लेक्समधील एका एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर अनोळखी इसमाने त्यांना पैसे काढण्यास मदत करतो, असे भासवून त्यांचे विश्वास संपादन केला. संधी मिळताच त्या भामट्याने फिर्यादीचे एटीएम कार्ड शिताफीने बदलून दुसरेच कार्ड त्यांच्या हाती सोपवले.

वृद्धाला या प्रकाराची पुसटशीही कल्पना आली नाही मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून एकूण एक लाख 20 हजार 81 रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला.






