पावणेतीन तासांच्या थरारानंतर मुक्ताईनगरात बिबट्या अडकला जाळ्यात


After a nearly three-hour-long ordeal, a leopard was trapped in a net in Muktainagar मुक्ताईनगर (13 एप्रिल 2026) : शहरातील ल शासकीय विश्रामगृह परिसरात दाखल झालेल्या बिबट्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली असतानाच तब्बल पावणेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. वनविभागाने दोनदा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या नागरी वस्तीकडे धावला मात्र आमदार चंद्रकांत पाटील व जमावाने लाठ्या-काठ्यांच्या सहाय्याने त्याला रोखून धरले. अखेर दुपारी 12.40 वाजता बिबट्या पिंजर्‍यात कैद होताच शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

वनविभागाने दिले इंजेक्शन
रविवारी पहाटे चार वाजता सातत्याने कुत्रे भुंकत असल्याने कर्मचार्‍यांना बिबट्या आल्याचा संशय आला व सकाळी 10 वाजता शेतकर्‍यांना इमारतीमागे बिबट्या दिसल्यानंतर आमदार पाटील यांच्यासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी बाजार असल्याने खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला. सकाळी 11 वाजता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जाळी लावून पहिले इंजेक्शन दिले मात्र चवताळलेल्या बिबट्याने भिंतीवरून उडी मारून बसस्थानकात प्रवेश केला. यावेळी एका कर्मचार्‍याला बिबट्याचे नख लागले. दुपारी 12.10 वाजता दुसरे इंजेक्शन दिल्यावरही तो पळत सुटला. अखेर ग्रामस्थ आणि वन विभागाच्या प्रयत्नांनी त्याला पकडण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !