यावलच्या केळी व्यापार्‍याची दिल्लीतील व्यापार्‍याकडून साडेतीन लाखात केली फसवणूक


Banana Trader from Yawal Defrauded of ₹3.5 Lakhs by a Delhi-based Trader यावल (13 एप्रिल 2026) : यावल शहरातील रहिवासी केळीचे व्यापारी यांच्याकडून दोन ट्रक, ट्रॉला केळी घेऊन दिल्लीच्या एका व्यापार्‍याने त्यांना पैसे दिले नाही व त्यांची तीन लाख 57 हजार 521 रुपयात फसवणूक केली. ही घटना 23 व 26 मार्च या दरम्यान घडली. या प्रकरणी यावल पोलिसात दिल्लीतील एका एजन्सीच्या अज्ञात मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
यावलचे केळी व्यापारी ज्ञानेश्वर नामदेव महाजन यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मार्च 2026 मध्ये त्यांच्याकडे शुभम केला एजन्सी नाव धारण केलेल्या दिल्लीतील व्यापार्‍याने कॉल केला व ट्रक ट्राला (क्रमांक आर. जे. 11 जी.डी. 3736) आणि पुन्हा ट्रॉला ट्रक (क्रमांक आर. जे. 11 जीडी 3847) या दोन ट्रॉल्यांमध्ये यावल येथुन महाजन यांनी दिल्ली येथे केळी पाठवली.

दिल्लीत ही केळी शुभम केला एजन्सी, शिवनारायण भाईजी केला स्टोर, दिल्ली पंजाबी बाग, मे रोड एफसी 312 पिलर या पत्त्यावर पाठवल्यानंतर दिल्लीतील केळी एजन्सीकडे तीन लाख 57 हजार 521 रुपये निघत होते. मात्र संबंधित दिल्लीच्या व्यापार्‍याने त्यांना पैसे दिले नाही. तसेच स्टेट बँकेच्या चेकचा स्क्रीनशॉट त्याने त्यांना पाठवून त्यांची दिशाभूल केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !