भालोदला व्याजाच्या पैशांवरून ठार मारण्याची धमकी : दोघांविरोधात गुन्हा
यावल (13 एप्रिल 2026) : यावल तालुक्यातील भालोद येथे एका 53 वर्षीय इसमाला व्याजाच्या पैशाच्या कारणावरून वाद घालत, त्याच्या घरात अनधिकृतपणे जाऊन त्याला शिवीगाळ करून दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली. तर याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
भालोद, ता.यावल येथील रहिवासी दिलीप जनार्दन चौधरी (53) यांनी फैजपूर पोलिसांनी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात अनधिकृतपणे रिंकू विनायक तायडे व अरविंद एकनाथ तायडे (दोघे रा. अट्रावल, ता.यावल) यांनी प्रवेश केला. व्याजाच्या पैशाच्या कारणावरून त्यांना दोघांनी शिविगाळ करून जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली.










